विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर MNS ला आता ठाण्यातून मोठा धक्का

206

विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याने होईल, असे भाकित वर्तवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेचा (MNS) एकही आमदार निवडून आला नाही. मनसेच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव झाला. यामध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही पराभव झाला. मनसेच्या सुमार कामगिरीमुळे पक्षाची मान्यता रद्द होणार आहे. आता मनसेला ठाण्यातून मोठा धक्का बसणार आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांच्याकडे सोपवली होती. पण दोन्ही जिल्ह्यांमध्ये मनसेचा (MNS) पराभव झाला. त्यामुळे जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे कायम आहे. ते पद जाधव यांनी सोडलेले नाही. जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. तो त्यांनी राज ठाकरेंना पाठवला आहे. ठाणे, पालघरमधील पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले  आहे.
अविनाश जाधव ठाणे मनसेचा (MNS) चेहरा समजले जातात. अनेक आंदोलकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बरीच आंदोलने ते हाती घेत असतात. जनसामान्यांचे प्रश्न ते मांडत असतात. ठाणे शहरामधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. भाजपाच्या संजय केळकर यांनी जाधव यांचा ५८ हजार २५३ मतांनी धुव्वा उडवला. जाधव थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना ४२ हजार ५९२ मते मिळाली. तर केळकरांनी १ लाख २० हजार ३७३ मते घेतली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.