राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मते असतानाही अटीतटीच्या लढाईत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. शिवसेनेचे नेते संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ९ ते १० तासांच्या प्रतिक्षेनंतर हा निकाल हाती आला. यात महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे सुद्धा तीन उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीची काही मते फुटली असल्याचे समोर आले असून शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरु; सोमय्यांनी मविआवर साधला निशाणा)
मनसेची टीका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलांच निशाणा साधला आहे. “शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले.” असे ट्वीट मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केले आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022
सेना लढाईतही हरली व तहात पण हरली
तर मनसेचे आमदार राजू पाटील ट्वीट करत म्हणाले “औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली” अशी खोचक टीका राजू पाटील यांनी केली आहे. दरम्यान मनसेने राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते.
Join Our WhatsApp Communityऔरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला.सेना लढाईतही हरली व तहात पण हरली. #राज्यसभानिवडणूक
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 10, 2022