- विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत हातची जावू द्यायची नाही असा निर्धार उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला असून यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक चांगली व्हावी यासाठी शाखाप्रमुखांनी लोकांमध्ये गेले पाहिजे असा फर्मानच त्यांनी काढला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शाखाप्रमुखांना लोकांमध्ये पिटाळून कामाला जुंपले जाणार आहे.
उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांना शिवसेनेची बांधणी करा असे आदेश दिले आहेत. लोकसभा, विधानसभा या निवडणुका वेगळ्या आणि महापालिका निवडणुका वेगळ्या असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जी चूक झाली तशी चूक महापालिकेत नको, अशाही सूचना केल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – Yamunabai Savarkar : ‘मी… येसूवहिनी’… सावरकर स्मारकात सांगीतिक अभिवाचनाचे आयोजन)
पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिका व्हावी यासाठी प्रत्येक शाखाप्रमुखाने लोकांमध्ये गेले पाहीजे, त्याच्या समस्या, मागण्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्या पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी शाखाप्रमुखांनी संघटनांत्मक बांधणी लोकांमध्ये जाऊन केली पाहिजे अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता शाखाप्रमुखांवरच याची अधिक जबाबदारी सोपवली आहे.
यासाठी लवकरच मुंबईतील गटप्रमुखांचे शिबिरही घेण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले असून मुंबईत उबाठा शिवसेनेचे दहा आणि काँग्रेसचे तीन आणि सपाचा एक अशाप्रकारे १४ आमदार निवडून आले आहेत. यासर्व आमदारांचा निधी वापरुन मुंबई महापालिका जिंकायची तयारी करा अशाप्रकारचे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे लोकसभा नाही, विधानसभा नाही, पण मुंबई महापालिका हातची जावू द्यायची नाही असाच निर्धार करत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन शाखाप्रमुखांवरच पक्षाची मजबूत बांधणी करण्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेत आदेश दिल्याचे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community