‘पर हम झुकेंगे नहीं!’ संजय राऊतांनी का केले ‘पुष्पा’ स्टाईलने ट्वीट?

127

गोरेगाव येथील भूखंड विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी ईडीने अटक केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातलगाचा या प्रकरणात प्रवीण राऊत यांचा काही आर्थिक व्यवहार झाला आहे का, याची चौकशी ईडीकडून केली जाणार असल्याचे समजते. एचडीआयएलमधील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर लावण्यात आला आहे. यानंतर ट्वीटवर संजय राऊत यांचे ट्वीट व्हायरल होत आहे.

( हेही वाचा : महापालिका आयुक्तांनी मानले राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचे विशेष धन्यवाद… )

राऊतांचे ट्वीट चर्चेत

यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राजकीय सूडबुद्धीतूनच ईडीची कारवाई सुरू आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. यासंदर्भात राऊत यांचे पुष्पा स्टाईल ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. ‘आधी लालच दाखवले..ऑफर्स दिल्या..घाबरवले, धमकावले तरीही आम्ही झुकलो नाही म्हटल्यावर कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे. यानंतरही आम्ही दुर्लक्ष केलं म्हणून आता केंद्र सरकारच्या ईडीला आमच्यामागे लावले आहे. पण काही झाले तरी आम्ही झुकणार नाही’, अशा आशयाचे ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांच्या कुटुंबाचीही चौकशी होऊ शकते

ईडीने सुजित पाटकर नावाच्या व्यक्तीच्या परिसराचीही झडती घेतली. सुजित हा संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी आणि विदिता यांच्या फर्ममध्ये भागीदार आहे. संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचे पुरावेही ईडीला मिळाले आहेत. प्रवीण राऊत यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. प्रवीण चौकशीत सहकार्य करत नव्हते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.