काश्मिरी पंडितांच्या समस्येवर आधारित चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ सध्या प्रचंड गाजत आहे. या चित्रपटावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. या चित्रपटात १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची कथा दाखवण्यात आली आहे. आता याच धर्तीवर ‘द केरळ स्टोरी’असाही एक चित्रपट येणार आहे. निर्माते विपुल शाह यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.
The kerla story #TheKeralaStory 32000 girls in 10 years from kerla and Mangalore went missing. @Swamy39 @AskAnshul https://t.co/6ngCQY72hB
— Naresh Patil (@Nareshpatilk) March 23, 2022
३२ हजार मुली बेपत्ता
विपुल शाह यांनी सांगितले की, ते सत्य कथेवर आधारित हा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बनवत आहेत. त्यांचा हा चित्रपट बेपत्ता झालेल्या ३२ हजार मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत. या चित्रपटाचा छोटा टीझरही प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये सुरुवातीला एक घड्याळ दाखवले गेले आहे. हे घड्याळ ११.५६ वाजता सुरू होऊन १२.०१ वाजता थांबते. घड्याळ थांबल्यावर एक ओळ स्क्रीनवर दिसते की, जर तुमची मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी पोहचली नाही, तर तुम्हाला कसे वाटेल? केरळमध्ये हजारो मुली गायब झाल्या आहेत आणि गेल्या १२ वर्षांमध्ये त्या आपल्या घरी कधीच परतल्या नाहीत. यासोबतच बॅकग्राऊंडला अनेकांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे.
(हेही वाचा #TheKashmirFiles: गोवा, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत ‘फिल्म जिहाद’)
१० वर्षांपासून हजारो मुलींची ISIS कडून तस्करी
व्हिडिओमध्ये पुढे लिहिले आहे की, गेल्या १० वर्षांपासून हजारो मुलींची ISIS आणि इतर इस्लामिक युद्धक्षेत्रांमध्ये तस्करी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या नावानंतर व्हिडिओच्या शेवटी लिहिले आहे की, ही कथा ३२ हजार मुलींची सत्यकथा आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’नंतर आता अनेक निर्माते आपल्या चित्रपटातून सत्य लोकांसमोर आणण्याचे धाडस दाखवू लागले आहेत, असे लोक म्हणत आहेत.
Join Our WhatsApp Community