राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता न आलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार की नाही, यावर आज शुक्रवारी उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक 10 जागांसाठी 20 जून रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार जोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी निकाल दिला. या निकालानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Bombay High Court dismisses the pleas of Maharashtra Minister Nawab Mallik and former Home Minister Anil Deshmukh for permission to cast their votes on June 20th for the MLC polls. Both of them will not be allowed to cast their votes.
(File photos) pic.twitter.com/nxDzeuskDL
— ANI (@ANI) June 17, 2022
राज्यसभा निवडणुकीत मतदान नाकारल्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन्ही नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने राखून ठेवलेल्या या निर्णयावर निकाल जाहीर करत या दोघांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. दोन्ही नेत्यांचा विधानपरिषदेसाठी मतांचा अधिकार न्यायालयाने नाकारल्याने आता महाविकास आघाडीचे दोन मतं कमी होणार असल्याचे दिसतेय.
Join Our WhatsApp Community