लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधी आले चर्चेत; का सुरु झाला #Pappu ट्रेंड?

141

लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पहिल्यांदाच सभागृहात बोलण्याची संधी मिळाली. संसदेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावरच चर्चा सुरू होती. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर ते चर्चेत आले, मात्र त्याच वेळी सोशल मीडियातही #Pappu हा ट्रेंड सुरू झाला.

२ वर्षांनंतरच त्यांचे हे पहिलं भाषण लोकसभेत झाले असून, या भाषणाची चर्चा ट्विटर वर सुरू झाली आणि #pappu हे हॅशटॅग राहुल गांधीच्या नावाने सुरू झाले. राहुल गांधी नेटक-यांसाठी आता मिमचा विषय झाला आहे.

ट्विटर युझर अरुण पुदुर म्हणतात, “पप्पू हे नाव राहुल गांधी वर इतक्यांदा वापरण्यात आला आहे, कि आता ट्विटर वर #pappu सर्च केल्यास ट्विटर राहुल गांधीचा प्रोफाइल दाखवते.”

(हेही वाचा Smriti Irani : भीलवाडा, स्नेहलता रेड्डी, गिरिजा टिक्कू…स्मृती इराणींनी काँग्रेसी कृत्यांचे करून दिले स्मरण; भारत मातेच्या हत्येच्या वक्तव्यावर काँग्रेसवाल्यांनी बाके वाजवली)

त्याच बरोबर ‘जिनेश पटेल’ बोलतात कि, “स्मृति इरानीचे भाषण चालू झाल्या झाल्या राहुल गांधी सभेतून फरार झाले, याला म्हणतात खरी भीती.”

“भाषणापूर्वी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून मुद्दे काढून घेताना दिसून आले, असे अमर यांनी व्हीडिओ पोस्ट करत सांगितले.

चंदन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी एकदम अश्लील निघाले? तसेच #पप्पू फरारी निघाला? बातम्या येत आहेत की त्यांनी स्मृती इराणींना फ्लाइंग किस केले? आणि मग लगेच संसद भवनातून पळ काढला? असे कृत्य कोण करत? कधी बहिणीच्या गालावर चुंबन घेणं, कधी बहिणीच्या फुल स्टेजवर तिचा हात धरून, कधी अचानक जाऊन मोदीजींना जादुई मिठी मारणं, अरे भाई, असं अश्लील कृत्य कोण करत? तुम्हा सर्वांना हे माहित आहे आणि मला यामध्ये एक संस्कारहीन व्यक्ती दिसत आहे! प्रतिष्ठा आणि संस्कृती म्हणजे काय हे त्याला कळत नाही? असो, परदेशी स्त्रीपासून जन्मलेल्या मुलाला कसे कळतील संस्कार?”

(हेही वाचा Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींचं असभ्य वर्तन; सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.