राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षे पदभार सांभाळला. कोणताही अनुभव नसतानाही आपण मुख्यमंत्रीपद भूषवले. परंतु हे मुख्यमंत्री पद आपण का आणि कोणाच्या आग्रहाखातर स्वीकारले याचा खुलासा उध्दव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या फेसबूक लाईव्हमध्ये केला. आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षे लावली.
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती पवारांनी केली
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ आमदारांनी बंड केल्यानंतर बुधवारी फेसबूक लाईव्हवरून जनतेशी संपर्क साधला. यामध्ये त्यांनी आपण मुख्यमंत्री कसा बनलो हे सांगितले. जेव्हा तिन्ही पक्षांनी जेव्हा एकत्र येत सरकार स्थापन करण्याचे अंतिम निर्णय घेतला.सर्व प्रकारचा निर्णय झाल्यानंतर शरद पवार यांनी मला बाजूला येण्यास सांगितले. एका बंदिस्त खोलीत गेल्यानंतर पवार म्हणाले, उध्दवजी सरकार स्थापन करण्याचा सर्व निर्णय झाला सर्व ठिक आहे. आमच्याही पक्षात ज्येष्ठ आमदार आहेत तसेच आपल्याही पक्षात आहे. त्यामुळे आपणच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती पवार यांनी केली. त्यांच्या सूचनेवर मी काही वेळाने विचार करत होकार दिला. त्यामुळे पवार यांनी दिलेली जबाबदारी आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या आग्रहामुळे मी जिद्दीने हे पद सांभाळले. यात कोणताही स्वार्थ नव्हते,असे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : १ जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० ऐवजी ४५० सुट्ट्या?)
मागील अडीच वर्षांमध्ये सरकारच्या स्थापनेच्या हालचाली आणि त्यानंतर चालवलेल्या सरकारमध्ये अनेक वेळा बैठका आणि सभा झाल्या. त्यावेळी कधीही मी मुख्यमंत्री कसा बनलो हे न सांगणाऱ्या उध्दव ठाकरे यांना सरकार धोक्यात आल्यानंतर जनतेसमोर याची स्पष्टोक्ती दिली.