मुख्यमंत्र्यांनी बंगला सोडला, उपमुख्यमंत्र्यांनी गाडी सोडली

एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेविरोधात बंडाळी केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले. त्यानंतर त्यांनी आपले शासकीय निवासस्ठान असलेला वर्षा बंगला सोडला. मात्र यानंतर आता राज्यातील घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय बंगला सोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली शासकीय गाडी सोडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला राजीनामा देणार का, अशा चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोडला ‘वर्षा’ बंगला

माझ्याच पक्षातल्या माझ्या माणसांना मी नको असेन तर मग काय करायचं? माझ्या लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी ते सुरत आणि इतर ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगायचं होतं. त्यांच्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी तुम्ही नको, तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये केले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री आपला मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवला.

(हेही वाचाः तेव्हाच शिवसेना होणार एकनाथ शिंदेंची!)

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या हालचाली

त्यानंतर आता उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपले शासकीय वाहन सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार हे आपल्या खासगी वाहनातून आपल्या निवासस्थानाबाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपली सुरक्षाही मागे ठेवली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रालयातील अर्धवट कामांच्या फायलींचा निपटारा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता कोसळण्याची शक्यता पुन्हा एकदा वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here