देशभरात सुरु झालेली अग्निपथ योजना ही जरी सुरुवातीला खराब दिसत असली तरी या योजनेवरून सैन्य दलातील जे रिफॉर्म सुरु आहे, त्यामध्ये सैन्यदल नवीन लक्ष्य गाठू शकते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निपथ योजनेवरून जे वादंग सुरु झाले आहे, त्यावर मौन सोडले.
काय म्हटले मोदी?
अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ देशातील अनेक राज्यांत हिंसक आंदोलन पेटले. रेल्वे जाळल्या, बसेसची तोडफोड झाली. जवळपास २०० कोटींच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाल्याचे समोर आले. या सर्व वादावर अखेर बंगळुरू येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने मागील ८ वर्षांत स्पेस आणि डिफेन्स क्षेत्राची दारे युवकांसाठी उघडली आहेत. रिफॉर्मचा मार्गच आपल्याला नवीन लक्ष्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अनेक वर्षांपासून या क्षेत्रात एकाधिकारशाही होती. ड्रोनपासून इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही युवकांना संधी दिली. सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवले. त्याठिकाणी युवकांनी आयडिया दिल्या. सुरुवात जरी खराब दिसत असली तरी आगामी काळात त्याचे खूप फायदे होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी जवळपास २७ हजार कोटींच्या विविध योजनांना कर्नाटकात हिरवा कंदील दाखवला. बंगळुरू येथे उपनगरीय रेल्वे योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. दुसरीकडे बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे उद्घाटन झाले.
(हेही वाचा मतदान संपले आता निकालाची प्रतीक्षा! चमत्कार घडणार की आकडे जिंकणार?)
Join Our WhatsApp Community