Agniveer Yojana : राहुल गांधी यांच्याकडून देशाची दिशाभूल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बरसले

142
Agniveer Yojana : राहुल गांधी यांच्याकडून देशाची दिशाभूल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बरसले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अग्निवीर योजनेबाबत देशवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. केवळ अग्निवीर योजनाच नव्हे; तर अर्थसंकल्पातील तरतुदींबाबतही राहुल गांधी दिशाभूल करीत आहेत. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या उत्तरात योग्य उत्तर देतील, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (२९ जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. या देशाचा तरूण सरकारच्या ‘अग्निवीर’रूपी चक्रव्युहात अडकला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात राहुल गांधी यांनी केला होता. तरुण अग्निवीर ‘चक्रव्यूह’मध्ये अडकले आहेत आणि सरकारने अग्निवीरांच्या पेन्शनसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. (Agniveer Yojana)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षनेत्या या विधाणावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, ‘या योजनेबाबत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभाध्यक्षांनी परवानगी दिली तर आपण अग्निवीर योजनेबाबत आणि अग्निवीरांना मिळणाऱ्या लाभांचा विस्तृत तपशील सभागृहात मांडण्यास मी तयार आहे’. राजनाथ सिंह म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत जे काही गैरसमज पसरविले आहेत त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री बोलतील. अर्थसंकल्पाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत, असे माझे मत आहे. सिंह म्हणाले, “देशाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील आहे. लष्कराशी संबंधित अग्निवीर सैनिकांबाबत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण आदेश द्याल तेव्हा मी अग्निवीरबाबत माझे म्हणणे द्यायला तयार आहे. (Agniveer Yojana)

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सुध्दा राहुल गांधी यांना सभागृहाच्या नियमांची जाणीव ठेवण्याची आणि सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करण्याचा सल्ला दिला. महाभारताच्या काळात कौरव सेनेतील सहा जणांनी ज्याप्रकारे अभिमन्यूचा वध केला होता तसेच मोदी सरकारने जनतेचा अभिमन्यू करण्यासाठी चक्रव्यूह रचला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सरकारच्या चक्रव्यूहात भारतातील जनता अडकली आहे. मात्र भाजपाचा हा चक्रव्यूह इंडी आघाडी फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला. इंडी आघाडीचे सरकार जातीय जनगणना आणि शेतकऱ्यांना कायदेशीर हमी भाव कायदा करून हा चक्रव्यूह भेदल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. (Agniveer Yojana)

(हेही वाचा – Election : महाराष्ट्रासोबत वायनाडमध्ये निवडणूक होणार!)

चक्रव्यूहाचे एक रूप… लोटस व्ह्यू

लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भाजपाने देशातील जनतेला चक्रव्यूहात अडकवले आहे. चक्रव्यूहाचे आणखी एक रूप म्हणजे पद्मव्यूह जे लोटस व्ह्यूमध्ये आहे. सहा लोक या चक्रव्यूहावर नियंत्रण ठेवत आहेत.” भारतातील तरुण, शेतकरी, माता-भगिनी, छोटे-मोठे उद्योगधंदे, या सर्वांना चक्रव्यूहात अडकवले जात आहे. राहुल गांधी यांनी पेपर लीकच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “अर्थसंकल्पात ‘पेपर लीक’वर अर्थमंत्र्यांनी एक शब्दही उच्चारला नाही, २० वर्षांतील सर्वात कमी अर्थसंकल्प शिक्षणासाठी दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात मध्यमवर्गाचा विश्वासघात केला. आता हाच मध्यमवर्ग इंडी आघाडीकडे येत आहे. (Agniveer Yojana)

जात जनगणना म्हणजे काय?

काँग्रेस जात जनगणनेच्या बाजूने आहे. याचा उल्लेख राहुल गांधी यांनी त्यांच्या निवडणूक भाषणात अनेकदा केला होता. सत्तेत आल्यास जात जनगणना करू, असे ते म्हणाले होते. आजही त्यांनी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत भाजपाला धारेवर धरले. जात जनगणना म्हणजे लोकांची जातीनिहाय आकडेवारी. ही आकडेवारी सामाजिक-आर्थिक विकास योजना तयार करण्यात, सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि विविध जातींमधील असमानता दूर करण्यात मदत करणारा ठरू शकतो. २०२१ च्या जनगणनेत जातीची आकडेवारी गोळा करण्याचा मुद्दा बराच वादग्रस्त ठरला आहे. (Agniveer Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.