आम आदमी पार्टीची मुंबईची जबाबदारी प्रीती शर्मा-मेननवर

106

मुंबई आम आदमी पार्टीने (आप) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी परिपत्रक जारी करून घोषणा केली.आम आदमी पार्टी सर्व म्हणजे २३६ जागांवर उमेदवार उभे करून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे.

प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठीराष्ट्रीय सहसचिव अंकुश नारंग यांची नुकतीच प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. स्वागतार्ह पाऊल आहे. त्या मुंबईतील आमच्या सर्वात मोठ्या नेत्या आहेत आणि त्या नेहमीच सत्याच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. आम आदमी पार्टी सर्व म्हणजे २३६ जागांवर उमेदवार उभे करून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचे आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी सांगितले.

(हेही वाचा – गणेश नाईक यांना अटक होणारच, जामीन अर्ज फेटाळला)

पक्षाने मला दिलेली कोणतीही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारते आणि मला सेवेची संधी दिल्याबद्दल अरविंद केजरीवाल जींचे आभार मानते. मुंबई ही माझी ‘जन्मभूमी’ आणि ‘कर्मभूमी’ आहे, असे मत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.

सिंचन घोटाळा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका

प्रीती शर्मा मेनन या यशस्वी उद्योजक आहेत. ज्यांनी महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला कॅब सेवा सुरू केली. इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या प्रीती शर्मा मेनन या महाराष्ट्रातील पक्षाचा चेहरा आहेत. भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील एक प्रमुख नाव, प्रीती यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ७०,००० कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला, ज्यात छगन भुजबळांना तुरुंगात जावे लागले होते. दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान आम आदमी पार्टीने कोविड हेल्पलाइन सुरू केली, ज्याने १२,००० हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत केली असल्याची माहिती आम आदम पक्षाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.