गुजरात येथील अहमदाबाद येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बुफेच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेच्या साडीचा पदर पेटल्याने तिचा होरपळून मृत्यू झाला. महिलेच्या साडीचा पदर जळल्याने ती गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर सहा दिवस तिच्यावर उपचार सुरू होती. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमास किंवा लग्न सोहळ्यात बुफेचं जेवण असल्यास नक्की काळजी घ्या…
कसा घडला प्रकार
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रजासत्ताक दिनी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातमधील अहमदाबाद शहरात २६ जानेवारीला हा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक कार्यक्रमादरम्यान एकच आक्रोश झाला. बुफेच्या रांगेत उभे असताना ५४ वर्षीय रश्मिका शाह या महिलेच्या साडीचा पदर पेटला. हा धक्कादायक प्रकार हॉटेल फोर पॉईंट्स बाय शेरेटॉन या पंचतारांकित हॉटेलमध्ये घडला. रश्मिका शाह यांचे पती उमेश शाह यांच्या फर्मने या ठिकाणी डिनरचे आयोजन केले होते. यावेळी आपल्या पतीसह उपस्थित असलेल्या रश्मिका यांच्या सिंथेटिकच्या साडीचा पदर पेटला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – विकास नियोजन खात्याच्या उत्पन्नात १२,७५० कोटींची वाढ )
बुफे टेबलवर प्लेट भरत असताना घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, मणिनगरमधील गंगेश्वर सोसायटीत राहणाऱ्या रश्मिका शहा यांचा सोमवारी संध्याकाळी या प्रकाराने मृत्यू झाला. २६ जानेवारी रोजी एलिसब्रिज येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुफेच्या रांगेत असताना रश्मिका यांच्या साडीने पेट घेतला होता. रश्मिका बुफे टेबलवर त्यांची प्लेट भरत होत्या, त्यावेळी त्यांच्या साडीच्या पदराचा शेफिंग डिशच्या इंधनाला स्पर्श झाला आणि साडीचा पदर जळाला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पोलीस निरीक्षण एच व्हि घेला यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community