हल्ली प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) प्रचारातही एआयचा वापर करण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. त्याला यशही आले होते. यंदा होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रयोगाने राजकीय पक्षांना लाभ होणार कि डोकेदुखी वाढणार, याचे तर्क लावले जात आहेत. (AI in Election)
(हेही वाचा – GST Department : जीएसटी विभागातील अपिल अधिकारी, उपायुक्त ब.रा. झगरे यांचा भोंगळ कारभार उघड)
तमिळनाडूमध्ये दिवंगत करुणानिधी यांचे संबोधन
तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) गेल्या महिन्यात एक पुस्तक प्रकाशन समारंभ झाला. ज्येष्ठ नेते ८२ वर्षीय टी आर बालू यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्या वेळी स्क्रीनवर दिवंगत नेते के. करुणानिधी आठ मिनिटे बोलले. त्यांनी बालू यांचे कौतुक केले आणि सोबतच आपले पुत्र एम.के. स्टॅलिन यांच्या कारभाराचीही प्रशंसा केली. आवाज देखील करुणानिधी यांचा होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे हे आभासी चित्र निर्माण केले गेले. अशा प्रकारे एआयचा वापर राजकीय पक्ष करू शकतात. या माध्यमातून लोकप्रिय नेत्यांच्या आवाजातील जाहिराती आणि संदेशांचा भडिमार होऊ शकतो.
राजकीय पक्षांचे आयटी सेल सज्ज
भाजपच्या (BJP) अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले जात आहे आणि मतदारसंघातील या प्रभावी मतदारांशी संपर्कात राहण्यासाठी एआयद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या माध्यमातून आभासी वास्तव आणि आभासी अवास्तव प्रतिमांचा वापर प्रचार व अपप्रचारासाठी मोठ्या होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या आयटी सेलच्या यंत्रणा त्याच्या वापर आणि अपप्रचाराचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी माहिती गोळा केली जात आहे. मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे. (AI in Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community