तुम्ही अमेरिकेला भारताशी आणि भारताला अमेरिकेशी जोडले आहे. टी 20 वर्ल्ड कप झाला, त्यातही भारताचे योगदान पाहिले. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हे तर अमेरिका आणि इंडिया होय, हीच तर जगाची नवी ताकद आहे. हेच तर स्पिरिट आहे, अशी नवी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात न्यूयॉर्क येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना मांडली.
आता आपले ‘नमस्ते’देखील मल्टी नॅशनल झाले आहे, लोकलपासून ग्लोबल झाले आहे. मी जेव्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि नेताही नव्हता तेव्हा मी इथे यायचो, या देशाला ओळखण्यासाठी यायचो, मनात अनेक प्रश्न असायचे, तेव्हा मी अमेरिकेतील २९ राज्यांचा दौरा केला. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा तुमच्याशी संपर्कात राहिलो, पंतप्रधान झाल्यावर माझे तुमच्याशी प्रेम वाढत गेले. जेव्हा माझ्याकडे कोणतेही सरकारी पद नव्हते तेव्हाही तुमचे सामर्थ्य ओळखायचो आणि आताही ओळखतो, तुम्ही राष्ट्रदूत आहात. मी जगात कुठेही जातो, प्रत्येक नेत्याच्या तोंडून भारतीयांचे कौतुक ऐकतो. जो बायडेन यांच्या घरी मी होतो, त्यांनी केलेले आदरतिथ्य भावुक करणारा होता, हा सन्मान १४० कोटी भारतीयांचा, तुम्हा अनिवासी भारतीयांचा आहे. मी जो बायडेन यांचे आभार मानतो असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
मी देशासाठी मरू शकलो नाही पण देशासाठी जगायचे
हे वर्ष सगळ्या जगासाठी महत्वाचे आहे. एक बाजूला जगात अनेक देशांमध्ये तणाव आहे आणि दुसऱ्या बाजूला काही देशांमध्ये लोकशाहीचा उत्सव सुरु आहे अमेरिकेत निवडणूक होत आहे, भारतात निवडणूक झाली आहे. भारतात झालेली निवडणूक ही आजवरची सर्वात मोठी निवडणूक होती अमेरिकेच्या पूर्ण लोकसंख्येच्या तुलनेत इतकेच नव्हे तर पूर्ण युरोपच्या एकूण मतदारसंख्येइतकी मते भारतात मतदान झाले. त्यांनी भारताची लोकशाही मजबूत केली, या निवडणुकीत काही अभूतपूर्व घडले, ते म्हणजे तिसरी बार मोदी सरकार! तिसऱ्यांदा आमचे सरकार आले आहे. असे मागील ६० वर्षांत भारतात झाले नव्हते. भारताच्या जनतेने जो पाठिंबा दिला आहे, त्याचे महत्व मोठे आहे. या तिसऱ्या टर्ममध्ये आम्हाला तीन पट ताकद आणि तीन पट गतीने पुढे जायचे आहे. मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे ज्याचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालेला आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेत्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. अनेकांना असह्य यातना झाल्या. आम्ही देशासाठी मरू शकलो नाही पण देशासाठी जरूर जगू शकतो. देशासाठी मरणे आपल्या नशिबात नव्हते पण जगणे आपल्या नशिबात आहे. मी स्वराज्यासाठी जीवन देऊ शकलो नाही पण सुराज्य आणि समृद्ध भारतासाठी जीवन समर्पित करणार, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community