आता AI ठरवणार बार, पबमध्ये तुम्हाला मद्य मिळणार कि नाही ?

या तंत्रज्ञानाचा वापर करून बार किंवा पबमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलांची ओळख पटवली जाणार आहे. पब आणि बारच्या प्रवेशद्वारावर उच्च प्रतीचे Motion Detection बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार आहे.

181
आता AI ठरवणार बार, पबमध्ये तुम्हाला मद्य मिळणार कि नाही ?
आता AI ठरवणार बार, पबमध्ये तुम्हाला मद्य मिळणार कि नाही ?
  • संतोष वाघ 

पब, डिस्को आणि बारमध्ये मद्यपान करण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलांची ओळख पटविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, मुंबईसह महत्वाच्या शहरातील प्रत्येक पब आणि बारच्या प्रवेशद्वारावर उच्चप्रतीचे बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यासाठीचे काम उच्च पातळीवर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.

पुणे शहरानंतर मुंबईत झालेले ‘हिट अँड रन’ प्रकरण संपूर्ण देशभरात गाजत आहे. या दोन्ही घटनांमध्ये वाहन चालवणाऱ्यांनी मद्यपान केल्याचे समोर आले आहे. हिट अँड रन सारख्या घटनांवर आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. २१ वर्षांखालील मुलांना मद्यविक्री करू नये हा नियम आहे, मात्र बार, पबमध्ये सर्रासपणे अल्पवयीन मुलांना प्रवेश देऊन मद्यविक्री केली जात आहे, परंतु यापुढे बार आणि पबमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलांना रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एआय (AI) या तंत्रज्ञानाचा वापर शहरातील  प्रत्येक बार आणि पबमध्ये केला जाणार आहे.

(हेही वाचा Worli Hit And Run प्रकरणी अखेर मिहीर शाहला अटक; 12 जणही पोलिसांच्या ताब्यात)

बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार

या तंत्रज्ञानाचा वापर करून बार किंवा पबमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलांची ओळख पटवली जाणार आहे. पब आणि बारच्या प्रवेशद्वारावर उच्च प्रतीचे Motion Detection बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार आहे. हे कॅमेरे ‘एआय’ (AI) तंत्रज्ञान संबंधित सॉफ्टवेअरला कनेक्ट असणार असून, त्याचे सॉफ्टवेअर हद्दीतील उत्पादन शुल्क विभागाच्या कक्षातील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मोबाईल फोनमध्ये असणार असून त्यांना त्यात २१ वर्षांच्या खालील तरुण बार किंवा पबमध्ये प्रवेश करीत असेल तर अलर्ट येईल आणि निरीक्षक दर्जाचे अधिकारी त्या संबंधित ठिकाणी जाऊन संशयित तरुण-तरुणीचे वयाचे पुरावे तपासून खात्री करतील, अशी माहिती उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली, तसेच “मुंबईसह महत्वाच्या शहरातील प्रत्येक पब आणि बारच्या प्रवेशद्वारावर उच्च प्रतीचे बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार असून हे काम उच्च पातळीवर सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.

एआय तंत्रज्ञानचे बुलेट कॅमेरे कसे काम करणार? 

Motion Detection बुलेट कॅमेऱ्यामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) आधारे छायाचित्रीत माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरची सुविधा असणार आहे, त्याआधारे संबंधित विभागास थेट प्रक्षेपण आणि विहीत वेळेनंतर बार आणि पब आणि इतर मद्यविक्री आस्थापना अंतर्गत व्यवहार सुरु असल्याबाबत इशारा (अलर्ट) किंवा संदेश (मेजेस) क्षेत्रीय अधिकारी (कार्यक्षेत्रीय दुय्यम निरीक्षक, निरीक्षक व अधीक्षक) यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध केले जाईल. त्यासाठी संबंधित अधिकारी यांना युजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येईल. बार, पबच्या प्रवेशद्वारवर बसविण्यात येणारी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, बॅकअप यंत्रणा, इन्व्हर्टर यंत्रणा इत्यादीची देखभाल व दुरुस्ती वेळेत करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची असेल. तसेच एआय (AI) ही यंत्रणा नादुरुस्त नसल्याची आठवड्यातून किमान २ वेळा पंडताळणी व खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्रीय दुय्यम निरीक्षक यांची राहील. पडताळणी अंती परवाना कक्षातील दोन्ही पैकी एखादा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बंद असल्याचे अथवा अन्य बाबी नादुरुस्त असल्याचे आढळून आल्यास त्याची  त्वरीत दुरुस्ती करण्याबाबत दुय्यम निरीक्षक यांनी संबंधित आस्थापना धारकला लेखी पत्र देवून त्याबाबतची नोंद अनुज्ञप्तीच्या पुस्तिकेत घेण्यात यावी.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.