तमिळनाडू विधानसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्ष आणि एआयएडीएमकेच्या युतीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) केली आहे. अमित शाह (Amit Shah) आणि पलानीसामी यांची बैठक झाली. याच बैठकीत युतीचा रस्ता मोकळा झाला. आगामी विधानसभा निवडणूक भाजप, अण्णाद्रमुक सोबत लढणार असल्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला असल्याची माहिती अमित शहांनी दिली. (Amit Shah)
राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात, तर राज्य पातळीवर अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी यांच्या नेतृत्त्वात लढवला जाईल, असं शाह (Amit Shah) म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीए प्रचंड बहुमतानं विजयी होईल, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला. तमिळनाडूत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन होईल. आम्ही ईपीएस यांच्या नेतृत्त्वात विधानसभा निवडणूक लढणार आहोत, असं अमित शाहांनी सांगितलं. (Amit Shah)
तमिळनाडूत पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीएचा दारुण पराभव झाला. त्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. पलानीस्वामी यांच्या नेतृत्त्वात लढलेल्या एनडीएला केवळ ६६ जागा मिळाल्या. राज्यात विधानसभेच्या २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. भाजपला केवळ ४ जागांवर यश मिळालं. तर अण्णाद्रमुकला ६६ जागा मिळाल्या होत्या. (Amit Shah)
हेही वाचा- पाणी वापराचे लेखापरीक्षण करा; जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांची सूचना
याआधी भाजप आणि अण्णा द्रमुकची अनेकदा युती झाली आहे. तर अनेकदा युती मोडलीदेखील आहे. १९९८ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी युतीत लढवली. २०२१ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष युतीत लढले. २०२३ मध्ये अण्णा द्रमुकनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. (Amit Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community