AIMIMचा प्रवक्ता दानिश कुरेशीला अटक, शिवलिंगाची विटंबना करणारी केली पोस्ट

175

ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू असतानाच अहमदाबाद सायबर क्राईमने असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असलेल्या AIMIMचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक केली आहे. दानिश याच्यावर हिंदू देवतांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप 

दानिश कुरेशी याने ट्विटच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हिंदूंच्या भावना भडकवण्याचा आरोप-सायबर क्राइमचे अस्सिटंट कमिश्नर जेएम यादव म्हणाले, दानिश कुरेशी नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या या पोस्टनंतर त्यांची टीम युजरच्या शोधात होती. ट्विटरवरील कंटेंट बहुसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारा होता. त्यानंतर दानिशला अटक करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर, AIMIM प्रवक्ता दानिशने एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यात त्याने शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त भाष्य केले होते. त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या ट्विटमधून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर सायबर क्राइमच्या टीमला दानिश कुरैशी शाहपूरमध्ये असल्याचे समजले, यानंतर त्याला अटक करण्यात आली.

(हेही वाचा औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराबाईंच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.