एमआयएमच्या मुंबईतील तिरंगा रॅलीबाबत प्रशासनाने यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत, मात्र त्यानंतरही खासदार इम्तियाज जलील यांनी रॅली काढण्याची घोषणा केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती करण्याचा कट आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आझाद मैदानात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची सभा येथे होणार आहे. ज्याला पोलिसांनी परवानगी दिली नाही. यानंतरही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मोर्चा काढण्यावर अडून आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या नावाखाली ही रॅली काढली जात आहे, यानिमित्ताने रझा अकादमीने ११ अॉगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानात केलेल्या ‘त्या’ दंगलीच्या पुनरावृत्ती होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
(हेही वाचा परवानगी नाही तरी हजारो मुसलमान एमआयएमच्या मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने)
जलील औरंगाबादहून निघाले
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील मुंबईला रवाना झाले आहेत, त्यांना वाटेत पोलिसांनी अडवले, मात्र त्यातून मार्ग काढत त्यांनी आपला मोर्चा पुढे वळवला आहे. इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएमची तिरंगा रॅली होणारच आहे.
जारी केले होते नवे आदेश
याची पोलिसांनी गंभीर दखल घेत शुक्रवारी, १० डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चे, निदर्शने यांना प्रतिबंध करणारा आदेश जारी केला. त्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. तसेच राज्यात सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचे आदेशात म्हटले आहे.