एमआयएमच्या मोर्च्यात कोरोना नियमांची ऐशी तैशी!

88
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर चांदिवली येथे सभा घेण्यात आली. त्यासाठी पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हे मोठ्या संख्येने चारचाकी वाहनांचा ताफा घेऊन औरंगाबाद येथून थेट मुंबईत आले. यावेळी मात्र सर्वांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांची ऐशी तैशी केली. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः एकदाही तोंडाला मास्क लावला नव्हता.

पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली 

आदल्या दिवशी पोलिसांनी या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी केला होता. त्यामध्ये मुंबईत सभा, मोर्चे आणि आंदोलनावर प्रतिबंध करण्यात आला होता. त्या आदेशात राज्यभर पसरत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा प्रतिबंध लावण्यात येत असल्याचे जाणीवपूर्वक म्हटले होते. असे असूनही या मोर्च्यात सहभागी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. कुणीही मास्क लावला नव्हता, तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे उल्लंघन केले होते. विशेष म्हणजे औरंगाबाद येथून शेकडो कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनीही कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. वाशी टोल नाका जवळही पोलिसांशी बोलताना जलील यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता.

तिरंग्याचा अवमान 

एमआयएमची सभा चांदिवली येथे घेण्यात आली, त्यावेळी व्यासपीठावर जे पोडियम उभारण्यात आले, त्या पोडियमला भारताचा तिरंगा लपेटलेला होता. अशा प्रकारे भारताचा राष्ट्रध्वज पोडियमला गुंडाळल्यामुळे तो वक्त्यांच्या पायाशी येत होता आणि त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. विशेष म्हणजे हा प्रकार पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थित झाला. ओवैसी हे कायदेतज्ज्ञ आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.