मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य; PM Narendra Modi यांची घोषणा

मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

144

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आता मुंबईला अर्थात महाराष्ट्राला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. ते गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र आणि मुंबईतील 30 हजार कोटींच्या प्रकल्पातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. 76 हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्टमधून 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. लहान मोठ्या गुंतवणूकदारांनी आमच्या सरकारच्या मोठ्या उत्साहात स्वागत केले. लोकांना माहिती आहे की, एनडीए सरकारच शाश्वती व स्थिरता देऊ शकते. तिसऱ्या टर्ममध्येच एनडीए सरकार तीन पट अधिक गतीने काम करेल, असा विश्वास लोकांना आहे आणि हे अगदी सातत्याने घडत आहे, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान, समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्र असे राज्य आहे की, ज्याचा विकसित भारतात मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात उद्योग आहे. दुनियाची सर्वात मोठी आर्थिक केंद्र मुंबई बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये दुनियातील नंबर एक राज्य बनले पाहिजे, येथे सह्याद्रीच्या डोगंरकड्यावर रोमांच आहे. येथे छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा Saras Baug मध्ये नमाज पठण; जागेवर कब्जा करण्याचे कट कारस्थान?)

पालखी मार्गाचे काम देखील गतीने

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग दोनशे किमी पूर्ण झाले आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी महामार्ग देखील लवकरच पूर्ण होऊन भाविकांसाठी लाभदायी होणार आहे. दळणवळणच्या माध्यमातून राज्याची प्रगती होते, महिलांना चांगल्या सुविधा मिळतात. एनडीए सरकार हे युवा, गरीब, शेतकरी, महिलांच्या विकासासाठी काम करत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील चांगले काम करत आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून 9 लाख कोटी युवकांना फायदा झाला आहे. कौशल्य विकास आणि रोजगार हे महत्त्वाचे आहे. आरबीआयने एक रिपोर्ट जाहीर केला त्यात गेल्या तीन वर्षात 8 कोटी रोजगार उपलब्ध झाले. यामुळे खोटे नरेटिव्ह करणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. यांची प्रत्येक रणनीती ही देशाच्या समोर पुढे येत आहे, यांची पोलखोल होऊ लागली आहे. रेल्वे, रेल्वे ट्रक, पुल बनतो त्यातून कोणाला कोणाला तरी रोजगार मिळतोच. पायाभूत सुविधांचा विकास होत असेल तर त्यातून लोकांना देखील रोजगार मिळतो, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)  म्हणाले.

निरंतर धार्मिक क्षेत्रांचा विकास करणार

धार्मिक क्षेत्राचा देखील निरंतर विकास करणे, हा एनडीए सरकारचे ध्येय आहे. पुणे ते पंढरपूरची यात्रा सुकर व्हावी म्हणून संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग जवळपास 200 किमी पूर्ण झाला आहे. संत तुकाराम पालखी मार्ग 120 किमी पूर्ण झाला आहे. तर सर्व वारकऱ्यांना पीएम मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.