रत्नागिरी विमानतळावर येत्या १५ दिवसांत नाइट लॅण्डिंग सुविधेसह विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी विमानतळावर ८० आसनी विमाने उतरण्यासाठी आवश्यक असलेली धावपट्टी तयार करण्यात आली आहे. रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू होण्यासाठी गतिमान कार्यवाही सुरू आहे. हा विमानतळ सुरू झाला की भविष्यात त्याचा फायदा येथील उद्योगांना चालना देण्यास मदत होईल. रत्नागिरी विमानतळावर रात्री विमान उतरण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेली नाइट लॅण्डिंगची सुविधा येत्या १५ दिवसांत उभारली जाईल. १०० मीटरची कंपाऊंड वॉल उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. टर्मिनल इमारतीसाठीही २१ कोटी रुपये मिळालेले आहेत. यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. गेली अडीच वर्षे ही प्रक्रिया रखडली होती. जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी ही प्रक्रिया २ महिन्यांत पूर्ण केली. जागेपोटी प्राप्त झालेल्या ६० कोटींपैकी ४७ कोटी रुपये संबंधित जमीन मालकांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. दहा लाखापासून १ कोटींची रक्कम जागेपोटी तेथील लोकांना मंजूर झाली आहे. भूसंपादन प्रक्रियेमुळे या विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
(हेही वाचा – उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना राऊतांनी दिल्या होत्या अश्लील शिव्या: रामदास कदमांचा गंभीर आरोप)
Join Our WhatsApp Community