मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी जे केले तो सर्व तमाशा होता. त्यामुळे मराठा समाजाची बदनामी झाली आहे. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही. त्या उलट धमकी, शिव्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करत अजय बारसकर महाराज (Ajay Baraskar Maharaj) यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.
बारसकर महाराजांनी पारदर्शकतेचा भंग केला, असा आरोप केला होता. त्याला उत्तर द्या. माझी भूमिका समाजाप्रती सकारात्मक असल्याचंही बारसकर यांनी म्हटलं असून जरांगें यांनी माझी माफी मागायला हवी होती शिवाय माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर किंवा खंडन त्यांनी केले नाही. लोणावळा आणि वाशी येथे त्यांनी पारदर्शकतेचा भंग केला असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देण्याऐवजी धमक्या, शिव्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण मी सत्य मांडत आहे. मी वारंवार आक्षेप घेतला, प्रश्न विचारले, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.
असे सांगून बारसकर पुढे म्हणाले की, जाहीर सांगतो माझी नार्को टेस्ट करा, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. नेतृत्त्व कसं नसावं, हे काल दिसले. कालचा सर्व प्रकार तमाशा होता. माझ्याकडून आडमुठेपणा झाला असल्याची कबुलीही मनोज जरांगे यांनी दिली असल्याचे बारसकर महाराज यांनी म्हटले आहे.
कालचे आंदोलन पाहिल्यानंतर जी कोट्यवधींची मराठ्यांची लोकसंख्या होती ती २०० वर आली असल्याचेही बारसकरांनी म्हटले आहे. आता कालच्या या भूमिकेमुळे समाजाची बदनामी होत आहे. राज्यातील सर्वच नेते तुमच्यावर टीका करत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community