मराठा आरक्षण व मराठा समाज याबाबत देशभर संभ्रम निर्माण झाला असताना ह. भ. प. अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी शनिवारी (२४ फेब्रुवारी) दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे, धमकी देणे, आंदोलनादरम्यान चोरून दरम्यान दूध भात खाणे, पाय चेपून घेणे, संभाजी महाराज यांच्या नावाने पैसे खाणे आदी आरोप मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. (Ajay Maharaj Baraskar)
मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर जे विनयभंगाचे, बलात्काराचे आरोप केले आहेत ते सर्व खोटे आहेत. असतील तर त्यांनी सर्व पुरावे दाखवावे व माझ्यावर गुन्हा दाखल करावा. जरांगे यांच्यावर ४२० चे गुन्हे नोंद आहेत. रेती व्यवसाय करून डंपर, जेसीबी कसे काय आले? याबाबत मी इन्कम टॅक्स विभागात तक्रार करणार आहे. आंदोलनादरम्यान कुणाकुणाच्या कुटुंबाला पंचतारांकित हॉटेलमधे राहण्याची सोय केली होती. असे अनेक रेकॉर्डिंग पुरावे मी सरकारी तपास यंत्रणा व पत्रकारांना देणार आहे असे बारस्कर म्हणाले. (Ajay Maharaj Baraskar)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार)
अशिक्षित, भामटा, धूर्त, नौटंकी माणूस – बारस्कर
उद्या याच सभागृहात (मुंबई मराठी पत्रकार संघ) मनोज जरांगे पाटील यांच्या काळ्या कारनाम्याचे मोठे बॉम्बस्फोट होणार आहेत. बॉम्बस्फोट करणारे वेगळे लोक आहेत. ते उद्या जगाला कळणार आहे. जाणता राजा व त्यांची माणसे मला मारायला टपली आहेत. मात्र मुंबई पोलिस माझे चांगले चांगले संरक्षण करत आहेत. जरांगे यांनी जर माझ्यावरील आरोप सिद्ध केले तर मी या ठिकाणी फाशी घेईन. त्यांचे आरोप मी सिद्ध करून दाखवणार आहे मग त्यांनी काय करावे हे जनताच ठरवेल असे बारस्कर म्हणाले. (Ajay Maharaj Baraskar)
मी १० पुस्तके लिहिली जरांगे यांनी दहा पुस्तके तरी वाचली आहेत का? अशिक्षित, भामटा, धूर्त, नौटंकी माणूस आहे. स्वतः मोठे होण्याची स्वप्न पाहणे व सहकाऱ्यांवर खोटे आरोप करणे हा त्याचा स्वभाव आहे असा आरोप बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी केला. त्याला कोणी प्रवक्ता नाही, वकील नाही, सल्लागार नाही, सर्व कार्यक्रम एकटाच करत आहे. आता वयोवृध्द आंदोलनात सहभागी करायला निघालेल्या जरागेंच्या मागे तरुण वर्ग कमी होत चालला आहे असे आरोप बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी यावेळी केले. अंतरवाली सराटी ते वाशी दरम्यान त्यांनी कुठे कुठे बंद दाराआड चर्चा केल्या, काय काय आर्थिक तडजोडी झाल्या, कुणाचे काय काय आदेश आले व आता पुढे काय रणनीती असणार आहे याचे सर्व रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे असा गौप्यस्फोट बारस्कर यांनी केला. (Ajay Maharaj Baraskar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community