मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, याला कोण जबादार? जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) स्वतः म्हणाले होते की, जर आरक्षण मिळाले नाही तर गोदावरीत उडी मारीन, तुम्ही तर उडी घेतली नाही, पण तुमच्या आवाहनाने अनेकांनी आत्महत्या केल्या. समाज हा नेतृत्वाचे अनुकरण करत असतो. त्यामुळे नेतृत्वाने विचारपूर्वक बोलायचे असते, असे सांगत अजय महाराज बारस्कर यांनी मराठा तरुणांच्या आत्महत्येमागे जरांगे पाटलांची ‘ती’ भाषा कारणीभूत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.
कालचा प्रकार हा तमाशा…
कोटीच्या लोकांचे नेतृत्व करतो म्हणणारे तुम्ही तुमच्या मागे काल २०० जणांचीही गर्दी नव्हती. कालपर्यंत कोणता नेता तुमच्यावर टीका करत नव्हता, पण कालपासून सगळे नेते तुमच्यावर टीका करू लागले आहेत. कारण तुमचा (Manoj Jarange Patil) आततायीपणा, विचारपूर्वक निर्णय न घेण्याची वृत्ती, नेतृत्च कसे नसावे, हे दिसून आले आहे. काल जो प्रकार झाला तो तमाशा होता. त्यामुळे त्यांना काल घेतलेला निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली होती काय मिळवले तुमच्या आततायी वृत्तीने? आम्ही हेच तुम्हाला सांगत होतो, असे अजय महाराज बारस्कर म्हणाले.
जरांगे पाटील झुंडशाहीचे समर्थक
माझ्यावर खोटे आरोप करता, जेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर होतो तेव्हा चार दिवसांच्या उपोषणानंतर त्यांना चार जण धरून उठवत होतो, इतके क्षीण झाले होते, पण काल त्यांची किती ताकद दिसली. १० – १० जणांना आवारत नव्हते. काय आहे हा चमत्कार? कशाला खोटे नाटे करता? असे का केले? जरांगे (Manoj Jarange Patil) तू तोडणार आहे, आम्ही जोडणारे आहोत, तू पेटवणारा आहे, आम्ही विझवणारे आहोत, तू द्वेषाचा समर्थ आहे, आम्ही प्रेमाचे समर्थक आहोत, तू झुंडशाहीचा समर्थक आहे, आम्ही लोकशाही मानणारे आहोत, असे अजय महाराज बारस्कर म्हणाले.
जरांगे पाटील यांची नार्को चाचणी करावी
माझ्यावर चारित्र्यहनन करणारे आरोप केले. पण त्याचे पुरावे मागितले, तेव्हा का नाही पुरावे दिले? आम्ही चारित्र्यवान आहोत. तुमच्या खोट्या आरोपांमुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. मी जे बोललो ते सत्यच आहे. माझी आणि जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) नार्को टेस्ट करावी, खरे खोटे उघड होईल, माझा आणि फडणवीस यांचा काही संबंध नाही. आरक्षण मिळवायचे असेल, तर हनुमानाच्या मंदिरात बसून मिळणार नाही. त्यासाठी मंत्रालयात यावे लागेल, न्यायालयीन लढा लढावा लागेल, धावपळ करावी लागेल असेही बारस्कर म्हणाले.
Join Our WhatsApp Community