देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी अजित पवार कशामुळे भाजपसोबत आले यावर प्रकाश टाकला. विरोधी पक्षांच्या आघाडीकडून मतदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. त्यांनी (Sharad Pawar) सुरुवातीला दलितांमध्ये संविधान बदलण्याची भीती निर्माण केली. त्यानंतर त्यांनी इतर समाजांमध्येही ही भीती तयार केली. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मी मराठवाड्यातील 8 पैकी 7 ठिकाणी सभा घेतल्या. त्यात काही जिल्ह्यांत जातीय ध्रुवीकरण झाल्याचे दिसून आले. हे ध्रुवीकरण महाराष्ट्रासाठी योग्य नाही. महाराष्ट्रात समाजा-समाजात दुफळी निर्माण होणे ही दुर्दैवी गोष्ट आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
(हेही वाचा शरद पवार २०१७मध्ये भाजपासोबत सरकार स्थापन करणार होते; पण…; Sunil Tatkare यांनी अनेक गुपिते फोडली)
उद्धव ठाकरेंकडे फारसे मराठी मतदार नाहीत
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील मराठी मतदार भाजपाच्या पाठीमागे असल्याचाही दावा केला. उद्धव ठाकरेंकडे आता मुंबईतील मराठी मतदार फारसा उरला नाही. ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली आहे. आम्ही वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या जागा वाढल्या. यामुळे मराठी मतदार भाजपच्या मागे असून, ते मोदींच्या नावाने भाजपला मतदान करतात हे स्पष्ट झाले. हे पाहून उद्धव ठाकरेंनी आता मुस्लिम मतांसाठी पायघड्या घातल्या. सध्या त्यांनी काँग्रेसपेक्षाही अधिक मुस्लिमधार्जिनी भूमिका घेतली आहे, असे ते म्हणाले. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजप संसदीय मंडळ घेणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
Join Our WhatsApp Community