महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात अंजली दमानिया यांनी केलेल्या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून ते पुन्हा एकदा नॉट रिटेबल झाले आहेत अशा चर्चा सर्वत्र सुरू आहे.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गावरुन जाणार असाल तर आधी ‘हे’ वाचा, नाहीतर ठोठावला जाऊ शकतो २० हजारांचा दंड )
अंजली दमानियांचे ट्वीट
अंजली दमानिया यांनी राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि या फोटोला किळसवाणे राजकारण मी पुन्हा येईल असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल तर नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अजित पवारांसोबत सात आमदार कोण आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु पुणे जिल्हा परिसरातील हे आमदार असावेत अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
https://twitter.com/anjali_damania/status/1644420389437857794
अनेक ट्वीट व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत त्याआधीच अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात अनेकांनी ट्वीट केले आहेत. “अजित पवार आणि सात आमदार अनरिचेबल स्टे ट्यून”, “रात्र वैऱ्याची आहे….” अशा प्रकारचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायल होत आहेत.
https://twitter.com/thakkar_sameet/status/1644380627121344513
https://twitter.com/ss_suryawanshi/status/1644394458170163201
Join Our WhatsApp Community