राज्यातील नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील महायुती सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचं (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. यासह हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या युद्धाचं स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जाहीर केलं. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj ) स्मारक उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी दि. १० मार्च रोजी केली.
( हेही वाचा : वाढवण बंदराला तिन्ही मार्गाने जोडणार ; विधानसभेत Ajit Pawar यांची घोषणा)
अजित पवार म्हणाले, “ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj ) पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर (Sangameshwar) हे एक प्रमुख ठिकाण आहे. त्याठिकाणी औरंगजेबाच्या (Aurangzeb) महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रम केला होता. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या संभाजी महाराजांच्या स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मी घोषणा मी करतो.”, असेही अजित पवार म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj ) पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु-बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.”