महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी, ७ एप्रिलला झालेल्या रत्नागिरीमधील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांना टोला लगावला. तसेच यावेळी अजित पवारांची मिमिक्रीही केली. त्याच मिमिक्रीचे उत्तर आता अजित पवारांनी देऊन राज ठाकरेंना जनतेनी नाकारलं असल्याचं म्हणत त्यांना शुभेच्छाही दिल्या.
नक्की अजित पवार काय म्हणाले?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेनी नाकारलेलं आहे. त्यांनी पाठिमागे एकदा निवडणुकीत बाहेर पडल्यानंतर १४ आमदार निवडून आणले. दुसऱ्या टर्मला एक आमदार निवडून आले, ते पण आमच्या जुन्नरच्या सहकाऱ्यांनी शरदराव सोनावणे यांनी त्याचं तिकिटं घेतलं, त्यामुळे तेवढी एक पाटी लागली. नंतर कल्याणचे आमचे एक सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्याबरोबर बहुतेक होते, काही लोकं सोडले तर बाकी सगळे लोकं त्यांच्यापासून दूर गेले आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवारांचं व्यंगचित्र काढणं याच्यात त्यांना समाधान वाटतं. याच्यातून ते समाधानी होत असतील, तर त्यांना शुभेच्छा.
(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवार यांच्या बारामतीत तरूणीचा विनयभंग)
राज ठाकरे काय म्हणाले होते?
‘मला वाटतं शरद पवारांनी खरंच राजीनामा दिला होता, पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी मागे घेतला असावा. हे आत्ताच असे वागतं आहेत, तर पुढे कसे वागतील असं त्यांना वाटलं असावं. जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या, जे होतंय ते चांगलं होतंय असं वाटतं, त्यांना वाटत होतं असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. यावेळी त्यांनी ए.. तू गप्प, ए… तू शांत बस, ए… तो माईक हातातन घे… हे सर्व पवार साहेबांनी पाहिलं, तर त्यांना वाटलं असेल की मी आत्ताच राजीनामा दिला तर हे असं वागतंय, उद्या मलाही म्हणेल,’ असं राज ठाकरे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community