लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यांपर्यंत मतदान पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्यातील प्रचारसभांना जोर आला आहे. यातच आता मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर “खासदार म्हणून पाच वर्षे वाया घालवल्याबद्दल” टीका केली. महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील (Aadhalraav Patil, Shirur) यांच्या प्रचारार्थ शिरूर येथे आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. तसेच आढाळराव यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मतदारांना केले. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Mumbai Airport Runway: ६ तास बंद राहणार, जाणून घ्या काय आहे कारण)
“कोल्हे फक्त शूटिंगमध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळे पाच वर्षे वाया गेली. रस्ते, रेल्वे, धरणे यांसारख्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम करू शकेल अशा व्यक्तीला निवडून द्या, असे पवार यांनी बुधवारी शिरूर लोकसभा मतदारसंघातील घोडेगाव येथील प्रचार सभेत सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणाले की त्यांचा पक्ष (NCP) महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, “आंबेगावमध्ये ६०० कोटी रुपयांची कामे केली”. “हिरडा वनस्पतीच्या नुकसानीसाठी आठ दिवसांत १७ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. जिल्हा नियोजनातून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. आम्ही सत्तेत नसतो तर हे सर्व काम करू शकलो असतो का? असा सवाल जनतेला केला. “आम्ही कांदा निर्यातबंदीचा प्रश्न सोडवला. दूध दराचा प्रश्नही लवकरच सोडवू. आम्ही सत्तेत राहिल्यास पायाभूत सुविधांची अधिक कामे करू. तसेच जनतेने हे लक्षात घेऊन आढळराव पाटलांना मतदान करावे असे आवाहन अजित पवार यांनी भर सभेत केले.
(हेही वाचा – Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भारतातील स्पर्धेत खेळणार )
आढळरावांनी आपल्या भाषणात बैलगाडी शर्यती आणि रेल्वेच्या कामांचे प्रश्न उपस्थित केले. “कोकण रेल्वे (Konkan Railway) आणण्यासाठी मधु दंडवते (Madhu Dandavate) यांना २८ वर्षे लागली. पुणे-नाशिक रेल्वेसाठी मी गेल्या १३ वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मी गेल्या २५-३० वर्षांपासून बैलगाडी शर्यतीसाठी झटत आहे. यासाठी तीन खटले चालवले, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटले लढवले, पैसे खर्च केले आणि शेवटी जिंकलो… विद्यमान खासदाराने काय केले?” असा सवाल आढळरावांनी जनतेला केला.
आढळराव पुढे म्हणाले, “मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आग्रह करून बनकरफाटा-घोडेगाव-भीमाशंकर-तळेघर-राजगुरुनगर या रस्त्यांची जोडणी संदर्भात खात्री करून दिली. वाडा-घोडा रस्त्यासाठी मी अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च केला. वढू येथे संभाजी महाराजांच्या १९० कोटी रुपयांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. कोल्हे यांनी कोपरी गाव दत्तक घेतले जेथे महिला आजही पाणी आणण्यासाठी २ किमी पायपीट करत आहेत. ज्याने कधीच काम केले नाही त्याला त्याची खरी जागा जनतेने दाखवायला हवी. असे विधान आढळराव पाटील यांनी केले. (Lok Sabha Election 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community