Ajit Pawar : भूखंडाचे श्रीखंड, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले ?; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

189
Ajit Pawar : भूखंडाचे श्रीखंड, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले ?; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar : भूखंडाचे श्रीखंड, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले ?; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

विरोधकांपैकी काही जण स्वत:वर भ्रष्टाचाराचे आरोप नसल्याचे सांगतात; पण तुम्ही मंत्री झाला, तर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. आमदार, खासदारांवर होतात का, भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले आहेत काय? एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊद इब्राहिमशी संबंध हे आरोप कोणावर झाले? असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला.

(हेही वाचा – Shahu Maharaj : काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या शाहू महाराजांना का पाठिंबा द्यावा; कोल्हापुरातील मतदाराचा थेट सवाल; ऑडिओ क्लिप व्हायरल)

बारामती येथे आयोजित वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली. ‘तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना?’, असा प्रश्न अजित पवार यांनी या वेळी उपस्थित केला.

मी कोणाच्या पाच पैशाला मिंधा नाही

या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. पण आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना? विरोधक माझ्यावर आरोप करतात; पण माझं मन मला सांगतं मी कोणाच्या पाच पैशाला मिंधा नाही. आताच्या खासदारांनी नजरेत भरणारे एक काम केले असेल तरी दाखवा. मी मंजूर करून आणलेली विकासकामे त्यांच्या परिचयपत्रकात दाखविण्यात आली आहेत. बारामतीकरांना अभिमान वाटेल, अशा इमारती उभ्या केल्या. मात्र, त्याचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले.

चाळीस वर्षे घरात राहूनही सून परकी

मी कधीही भेदभाव केला नाही. चाळीस चाळीस वर्षे घरात सून येऊन तिला परकी मानले नाही. ती शेवटी घरचीच झाली ना, पण काहीजण तिला परकी मानतात. महिलांनी याबाबत बारकाईने विचार करायला हवा. कारण तुम्ही कुठे ना कुठे सून म्हणून आला आहात. तुम्ही सून म्हणून आल्यानंतर मालकीण झालात आणि घरातील वरिष्ठांनी परकी म्हटले, तर तळपायाची आग मस्तकाला जाणार नाही का?, असा सवाल करीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्याला अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.