बारामती विधानसभा न लढवता काकांसमोर Ajit Pawar खेळत आहेत नवी खेळी ?

74
बारामती विधानसभा न लढवता काकांसमोर Ajit Pawar खेळत आहेत नवी खेळी ?
  • प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर सर्व पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी निवडणुका न लढण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा यासंदर्भात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अशा प्रकारची वक्तव्य करून अजित पवार राजकारणातील मातब्बर समजल्या जाणाऱ्या आपल्या काकांच्या विरोधात नवी खेळी तर खेळत नाहीत ना असा प्रश्न उभा राहिला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपूत्र जय पवार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोललं जात आहे. तर काही वेळा अजित पवारच बारामतीतून उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. पण आता अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असे विधान अजित पवार (Ajit Pawar) यांनी करून आपल्या विरोधी पक्षाला संभ्रमात टाकून ठेवले आहे. शेवटपर्यंत आपण काय करणार आहोत याचा थांगपत्ता न लागून देणे हीच अजित पवार यांची खेळी तर नाही ना ? शरद पवार यांचे राजकारण जवळून पाहणाऱ्या कित्येक लोकांचे म्हणणे असते की पवारांना जे करायचे आहे ते कधी बोलत नाहीत आणि जे करायचे आहे त्याचा थांग पत्ता देखील लागून दिला जात नाही. हीच खेळी अवलंबून अजित पवार हे आपल्या काकांच्या विरोधात नवा डाव तर टाकत नाहीत ना ? असाच काहीसा प्रश्न राजकीय जाणकारांमध्ये बोलला जात आहे.

(हेही वाचा – Congress च्या सभेत महिला नेत्यांचा अपमान, सेलजांनी देखील पक्षातील नेत्यांना सुनावले खडे बोल)

शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका

काळानुरुप वडीलधाऱ्यांनी सत्तरच्या पुढे गेल्यानंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे. परंतु, काही-काही जण ऐकत नाहीत. हट्टीपणा करतात. एवढा हट्टीपणा कशासाठी, दुसऱ्याला जमणार नाही का, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करुन दाखविले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. मला कोणाचाही अपमान करायचा नसल्याचे असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघात भाष्य करून गुगली टाकली आहे. त्यामुळेच शरद पवार गटातील नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.