महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. यावर आता भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि हे आमदार सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे मत व्यक्त केले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि ४० पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचे आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो.’ रविवार, २ जुलै महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला, सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी आमदारांची बैठक घेतली, त्यानंतर तडक राजभवनात पोहचले. तिथे शपथविधीच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली होती, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार हे मंत्री मंडळात सहभागी होणार असल्याचे अधिकृत सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याचे निश्चित झाले. राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनात अजित पवार आले, तेव्हा त्यांच्या सोबत २५ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्या सारखे ज्येष्ठ नेते यांचा यात समावेश आहे.
(हेही वाचा Ajit Pawar : राज्यात राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटली; अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार)
Join Our WhatsApp Community