रविवार, २ जुलै महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला, सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी आमदारांची बैठक घेतली, त्यानंतर तडक राजभवनात पोहचले. तिथे शपथविधीच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली होती, त्यानंतर प्रत्यक्ष शपथविधीचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, बाबूराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
(हेही वाचा Ajit Pawar : राज्यात राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटली; अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार)