Ajit Pawar : अजित पवारांचे सख्खे भाऊ म्हणतात… नात्यांचीदेखील एक्सपायरी डेट असते

254
Ajit Pawar : अजित पवारांचे सख्खे भाऊ म्हणतात... नात्यांचीदेखील एक्सपायरी डेट असते
Ajit Pawar : अजित पवारांचे सख्खे भाऊ म्हणतात... नात्यांचीदेखील एक्सपायरी डेट असते

अजित पवारांचे (Ajit Pawar) सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीमधील (Baramati) काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला पवार यांनी संवाद साधला. त्या वेळी श्रीनिवास पवार (Srinivas Pawar) म्हणाले की, “तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा?, मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्या वरती उपकार आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत.”

(हेही वाचा – Nitin Gadkari : नितीन गडकरींचे पंतप्रधानपदाविषयी उघड वक्तव्य; म्हणाले…)

मला दबून जगायचे नाही

श्रीनिवास पवार पुढे म्हणाले की, जमीन आपल्या नावावर केली; म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नाही. ज्यांना कुणाला काही पद मिळाले, ती साहेबांमुळे मिळाले. साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटले नाही. मी वेगळा माणूस आहे. औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचे नाही. मला दबून जगायचे नाही, जगायचे तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.

भाजपला शरद पवार संपवायचे आहे

ही सगळी चाल भाजपची (BJP) आहे. भाजपला शरद पवार (Sharad Pawar) संपवायचे होते. घरातले व्यक्ती जर बाहेर पडला, तर आपण घर फोडू शकतो. घरातला माणूस घरच्याला माहीत नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. मला हे अजिबात पटले नाही. साहेब जर दहा वर्ष जुने असते, तर कळलं असतं, साहेबांनी काय केलं असतं. वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होते आणि ते दिल्लीत होते, असेही श्रीनिवास पवार या वेळी म्हणाले.

पवार कुटुंबातील युगेंद्र पवार यांनीही अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात प्रचार चालू केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.