जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्ताने शुक्रवारी, ५ मे रोजी युवा संवाद सामाजिक संस्था आयोजित पुण्यात प्रथमच ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून राज ठाकरेंना व्यंगचित्र रेखाटण्यासाठी आग्रह केला. त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीत चर्चेत असलेले अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले आणि शेवटी काय लिहू, ‘गप्प बसा’ असे राज ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
उपस्थितांनी राज ठाकरेंना व्यंगचित्र रेखाटण्याचा आग्रह केल्यानंतर ते म्हणाले की, ‘गेले दोन चार दिवस जे काही चालले आहे, ते पाहून अजित पवार यांचे व्यंगचित्र काढण्याचा प्रयत्न करतो. मला ते कितपत येईल ते माहिती नाही.’ अवघ्या काही मिनिटांत राज ठाकरे यांनी अजित पवारांचे व्यंगचित्र रेखाटले. व्यंगचित्र पूर्ण होताच राज ठाकरे म्हणाले, पुढे काय लिहू, ‘गप्प बसा.’
(हेही वाचा – मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच, मग कसा येतो हे…; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान)
तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले की, ‘आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे म्हणजे मला आलचे पाहिजे. फार अप्रतिम चित्र आहेत. रोज माझा हात शिवशिवत असतो, पण शांतता मिळत नाही त्यामुळे कधी मला वेळ मिळत नाही. पण ते चित्र माझ्या भाषणातून बाहेर पडत असतात. मी आज शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे. मला सगळ्यांसमोर व्यंगचित्र काढण्याची सवय नाही. मला आज जजमेंट आले नाही जे आहे ते गोड माना.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community