सोमवारी महाराष्ट्राच्या विधीमंडळात पार पडलेल्या बहुमत चाचणीमध्ये शिंदे-भाजप सरकारने विजय मिळवत आपल्या सत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अडीच वर्षात तीन पदं भूषविणारे देवेंद्र फडणवीस हे सर्वात नशीबवान नेते असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘मी आलो आणि यांना घेऊन आलो’, फडणवीसांचा मविआला टोला)
फडणवीसांना टोला
महाराष्ट्राच्या विधीमंडळातील सर्व आमदारांमध्ये देवेंद्र फडणवीस हे एकमेव नशीबवान आमदार आहेत. गेल्या अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते झाले. त्यामुळे कुठलंही महत्वाचं पद देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांत सोडलं नाही, असे म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
(हेही वाचाः ‘हो! हे आमदार ED मुळेच इथे आले आहेत पण…’,काय म्हणाले फडणवीस?)
फडणवीसांमध्ये जोश दिसला नाही
आजवर अनेक वर्ष मी देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात भाषण करताना पाहिले आहे. पण आज भाषण करताना फाडणवीसांमध्ये तो जोश पहायला मिळाला नाही. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यात वेगळाच जोश पहायला मिळाला, पण बहुमत चाचणीवर आभार प्रस्ताव सादर करताना दिसला नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
(हेही वाचाः Maharashtra Assembly session: अजित पवारांनी घेतली फडणवीसांची खुर्ची!)
Join Our WhatsApp Community