कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रूर औरंगजेबशी केलेली तुलना भोवण्याची चिन्हे आहेत. सोमवारी १७ मार्च २०२५ या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात, विधानसभा आणि विधान परिषदेत, या विषयाला वाचा फोडण्यात आली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले.
हा महाराष्ट्राचा अपमान
कामकाज सुरू होताच भाजपा विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. दरेकर म्हणाले, उत्तम प्रशासक म्हणून राज्याचा कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची क्रूर औरंगजेबाशी तुलना करून सपकाळ यांनी अत्यंत निंदनीय कृत्य केलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. सत्ताधारी आमदारांनी सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत सभागृह दणाणून सोडले. यामुळे १० मिनिटे सभागृहाचे कामकाम तहकुब करावे लागले. (Ajit Pawar)
व्यक्तिगत टीका नको
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनीदेखील सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘व्यक्तिगत टीका कोणीही, कोणावरही करू नये’ असे सांगत, ‘हे सरकार औरंगजेबी वृत्तीचं आहे, असा आरोप केला. तर काँग्रेसचे भाई जगताप यांनी यावेळी बोलताना, हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंच नाही, असा दावा केला. अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह असून कठोर कारवाईच्या मागणीवर सरकार गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन दिले. (Ajit Pawar)
दिल्लीतील नेत्यांना खुश करण्यासाठी
दुसरीकडे, विधानसभेतही भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. आपल्या दिल्लीतील नेत्यांना खुश करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी काहीही बोलावं, हे योग्य नाही. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असे सावरकर म्हणाले. (Ajit Pawar)
नियम-कायदे तपासून कारवाई करणार
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूतोवाच केले. पवार म्हणाले, “राजकीय पक्ष किंवा पक्षाच्या अध्यक्षांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. काहीजण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याकरिता अशा पद्धतीने काही वक्तव्ये करायची, की ते खुश होतील. मात्र यामुळे त्यांची मते कमी होतात, यातून त्यांची लायकी, पात्रता कळते. तो काय उंचीचा नेता आहे, तो त्या गोष्टीला (पदाला) पात्र होते का? काहीही बरळत सुटलेत. सपकाळ यांच्या वक्तव्याबाबत नियम-कायदे काय आहेत, ते तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. यात कोणतीही हयगय केली जाणार नाही,” असे आश्वासन अजित पवार यांनी विधानसभेत दिले. (Ajit Pawar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community