शरद पवारांची साथ सोडल्यापासून अजित पवार यांनी अनेकदा शरद पवारांवर फक्त प्रश्नांचा भडीमार करत त्यांच्यावर टीका केली आहे. वय झाल्यावर आता आशीर्वाद द्यायचे सोडून अजून किती दिवस आदेश देत राहणार? अजित पवारांच्या या प्रश्नाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भूकंप आणला होता. आता जुन्नर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा एकदा काकांवर प्रश्नांचा भडीमार केला.
काय म्हणाले अजित पवार?
१९९५ यामध्ये मी केवळ आमदार होते. त्यावेळी आघाडीचे सरकार पडले. १९९९ ला परकीय व्यक्तीकडे पक्षाचे नेतृत्व नको, अशी भूमिका वरिष्ठांनी घेतली. सहा महिन्यात मी पुन्हा आमदार झालो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत सत्तेत गेली. तेव्हा परकीय व्यक्तीकडील नेतृत्व कसे मान्य झाले? सहा महिन्यांतच कुठे गेला हा विचार? आजवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला, पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का मिळाली नाही? आर.आर. पाटील, छगन भुजबळ असे अनेक नेते आपल्याकडे होते, त्यापैकी कुणालाही मुख्यमंत्री का करता आले असते. मी काय माझाच हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गोलो, ते चालते, मग भाजपसोबत सत्तेत गेलो तर काय बिघडले? वरिष्ठांनी निर्णय घेतला कि चालतो, कनिष्ठांनी घेतला तर का चालत नाही? नरेंद्र मोदींना पर्याय आहे का? ममता बॅनर्जीं यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यांनी असा का निर्णय घेतला कारण समोर मोदी आहेत ते त्या जाणतात, तुम्हाला का लक्षात येत नाही?, अशा प्रकारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांना सुनावले.
Join Our WhatsApp Community