धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार 

155

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सरकारच्यावतीने मंगळवारी दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

शेतक-यांचे नुकसान होऊ नये

मुळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ब-याचदा व्यापारी वर्गाकडे पैसे जातात. आजुबाजुला असणाऱ्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र, त्या राज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि ते पण बोनसचा फायदा घेतात याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची बैठक घेतली होती, असेही पवार यांनी सांगितले.

( हेही वाचा: “कोण अजित पवार? मी नाही ओळखत”, नारायण राणेंचा हल्लाबोल )

शेतक-यांच्या नावाखाली दुकानदारी चालूयं

या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी चाललेली आहे ती फार मोठी आहे याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.