बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली. यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात ‘आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं, पण पुढे अर्थखाते टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही,’ असे विधान केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
बारामतीत ४२ कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुलाचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मार्केट कमिटीला ५ कोटी रुपये देऊन जागा घेण्यात आली आहे. म्हणजे मार्केटला जागा देताना मी फुकट देतो, पण त्यांची जागा घेताना ५ कोटी दिले, असे मिश्किल वक्तव्य करत ते पुढे म्हणाले की, “टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली.(Ajit Pawar)
(हेही वाचा-Vande Bharat Express : आजपासून ९ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होणार)
त्यानंतर लगेच खरेदी-विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, नाही टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. तिथे चुका होत असतील, तर दुरुस्त केल्या पाहिजेत,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community