Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

216
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिवस, सद्भावना दिन म्हणून देशभर पाळला जातो. यानिमित्त आज मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

(हेही वाचा – Himachal land slide : हिमाचल मध्ये ५५ दिवसात ११३ वेळा भूस्खलन ,३३० जणांचा मृत्यू)

उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, भावनिक ऐक्य आणि सामंजस्याने काम करण्याची तसेच हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करुन व संविधानिक मार्गाने मतभेद सोडविण्याची शपथ दिली.

मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शपथ घेतली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.