Ajit Pawar : अजित पवारांना कोणी डिवचले ?

118
Ajit Pawar : अजित पवारांना कोणी डिवचले ?
Ajit Pawar : अजित पवारांना कोणी डिवचले ?
मुंबई प्रतिनिधी
सत्ता संघर्षाचा निकाल लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा (Ajit Pawar) हेच पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या काही दिवसांपासून येत असतानाच भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी अजित दादांना डिवचले आहे. मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत “मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही तर १४५ आमदारांची गरज असते” असा खोचक टोला लावला आहे. त्यामुळे भाजपमधल्याच काही लोकांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून नको आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोहित कंबोज यांनी सदरील पोस्ट दुपारी डिलिट केली आहे.

(हेही वाचा-Central Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर १० विशेष लोकल)

नेत्यांची मन जुळली पण कार्यकर्त्यांची नाही
बुधवारी लालबागच्या राजासमोर एका कार्यकर्त्याने एक चिठ्ठी अर्पण केल्याने पुन्हा राजकारण पेटलं आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भाजपबरोबर जरी राष्ट्रवादी असली तरी कार्यकर्त्यांमध्ये अजूनही सख्ख्या जुळून येण्यासाठी वेळ लागणार आहे. भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) गटांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आहे हे या विधानावरून दिसून येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जरी मन जुळली असतील तरी कार्यकर्त्यांची अजूनही मने जुळलेली नाहीत हेच या विधानावरून दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.