तीन पक्षांचे सरकार चालवताना अजित पवारांनी चक्क चालवली रिक्षा!

पियाजिओ कंपनीने तयार केलेली इलेक्ट्रिक रिक्षाची अजित पवारांनी पाहणी केली. त्यानंतर रिक्षा चालू करून मस्त पैकी एक फेरफटका मारून आले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे, त्या रिक्षाची चाके वेगवेगळ्या दिशने चालतील, अर्थात सरकार पडेल, अशी टीका भाजपच्या नेत्यांनी अनेकदा केली आहे, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाआघाडी सरकार चालवताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर प्रत्यक्ष रिक्षा चालवून रिक्षाची तिन्ही चाके एकाच दिशेने चालतात का, हे अखेर पडताळून पाहिलेच. त्यामुळे पुन्हा एकदा यावर चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवारांनी चालवली इलेक्ट्रिक रिक्षा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिक्षा चालवण्याचे निमित्त होते ठरले ती इलेक्ट्रिक रिक्षा! बारामतीमध्ये शनिवारी, २८ ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी चक्क एक रिक्षा स्वत: चालवून उपस्थितींना आश्चर्याचा धक्का दिला. बारामतीच्या पियाजिओ कंपनीने इलेक्ट्रिक  रिक्षा तयार केली आहे. पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. या भेटीच्या वेळी अजित पवारांनी इलेक्ट्रिक रिक्षाची चक्कर मारली. पवारांनी भल्या पहाटेपासून त्यांच्या कामांचा झंझावात सुरू केला. एका कंपनीच्या कार्यक्रमादरम्यान पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी बारकाव्याने पाहणी केली. बाजारात इलेक्ट्रिक कार, दुचाकी आल्या आहेत. पण आता रिक्षा सुद्धा इलेक्ट्रिक आली आहे. अजित पवारांनी या रिक्षाची पाहणी केली. रिक्षाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर रिक्षा चालू केली आणि मस्त पैकी एक फेरफटका मारून आले.

रिक्षा चालवून अजित पवारांचे विरोधकांना अप्रत्यक्ष उत्तर!

अजित पवार यांनी  इलेक्ट्रिक रिक्षा चालवण्याचा मोहापायी त्यांनी विरोधकांच्या टीकेला साजेसे वर्तन केले आहे. तीन पक्षांचे सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा अशी हिणवणी विरोधक करत असतात, तीच रिक्षा अजित पवारांनी प्रत्यक्ष चालवून दाखवली आणि मजेत फेरफटका मारून तीन चाकांच्या रिक्षाची चाके एकाच दिशेने चालवून त्यांनी महाविकास आघाडीही एकाच विचाराने चालत आहे, असे दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here