‘गुलाबी सरडा’ टीकेवरून Ajit Pawar गट संतापला; म्हणाले संजय राऊत हा… 

186
‘गुलाबी सरडा’ टीकेवरून Ajit Pawar गट संतापला; म्हणाले संजय राऊत हा... 
‘गुलाबी सरडा’ टीकेवरून Ajit Pawar गट संतापला; म्हणाले संजय राऊत हा... 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार सभांच्या तयारीला लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा (MVA) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मेळावा मुंबईत पार पडला होता. यावेळी उबाठा शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवारांवर बोचरी टीका करत त्यांची ‘गुलाबी सरडा’ असा उल्लेख केला. राऊतांच्या या टीकेवर संतापलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांना दुतोंडी सापाची उपमा दिली आहे. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Assembly Elections : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षित)

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार संजय राऊत यांनी टीका केल्यावर अजित पवार गट पेटून उठलं आहे. यावर पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, ज्या व्यक्तीचा नरडाच सकाळपासून दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला वळवळत असेल त्याच्या नरड्यातून सरडा शब्द आला असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण नाही. अजितदादांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले असेल तर जबानीचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी सापाने दुसऱ्याकडे तोंड दाखवण्यापेक्षा स्वत:च्या तोंडाकडे पाहावे असं त्यांनी म्हटलं. (Ajit Pawar)

काय म्हणाले होते संजय राऊत?

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे, या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे. तुमचे जे लाडके भाऊ आहेत त्यांनी रंग बदलला. ते आता पिंक झालेत. सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो. आता हा गुलाबी सरडा (Gulabi Sarda) बारामती सोडणार असं मी ऐकलं आहे. कुठे जाणार हे माहिती नाही. परंतु गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला रंग भगवा आहे असं सांगत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

(हेही पाहा – इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल)

तसेच बाजूच्या तेलंगणा राज्यात केसीआर यांचा गुलाबी रंग होता ते पराभूत झाले. पिंक कधीही राजकारणात जिंकत नाही. एकतर भगवा रंग जिंकतो किंवा तिरंगा..तिरंग्याच्या रक्षणाला भगवा रंग आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, तिरंग्याचे रक्षण जर कुणी करेल तर तो भगवा. आम्ही हे रक्षण करतोय. त्यामुळे पिंकची काळजी नाही तो रंग आता गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…मशाल बुडाला आग लावायला आहेच असंही संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हणत अजितदादांवर नाव न घेता हल्लाबोल केला. (Ajit Pawar)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.