अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर आता त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून या राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ या पक्षचिन्हाची मागणी केली आहे.
दुसरीकडे, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – NCP Crisis : राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला? अजित पवारांचा थेट सवाल)
अजित पवारांनी गत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी आपल्याला जवळपास 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. या घटनाक्रमामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community