राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४व्या वर्धापन दिनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
(हेही वाचा – अमित शहांच्या सभेला पंकजा मुंडेंना मानाची खुर्ची; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?)
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीटद्वारे आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, शरद पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र…नजरे समोर राष्ट्र…’हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
दरम्यान अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. तसेच शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांसोबत प्रतिक्रिया देणे टाळण्याचे समोर आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community