काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबीय दिवाळी स्नेहभोजनाच्या निमित्ताने भेटले होते. त्यानंतर शनिवारी (११ नोव्हेंबर) आता बारामतीतील एका कार्यक्रमा प्रसंगी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमात दिसले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजितदादा आपल्या बहिणीला दिवाळीचं काय गिफ्ट देणार यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मिश्कीलपणे त्या म्हणाल्या की दादालाच विचारा काय गिफ्ट देणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule)
आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्या आधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे.
(हेही वाचा : Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस)
त्यामध्ये अजित पवार सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारिक आहे व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लाऊन बसले होते, त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे का नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community