पियूष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) यांची लोकसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन (BJP)जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहिर केली आहे. ३ सप्टेंबरला दोन जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होईल. म्हणजे प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होते. महायुतीकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येऊ शकतात. महायुतीला २०० पेक्षा आमदारांचा पाठिंबा आहे.
राज्यसभेच्या या दोन जागांसाठी भाजप, अजित पवार गट, शिवसेना आग्रही आहे. लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar) फक्त चारच जागा सोडण्यात आल्या होत्या. पियूष गोयल (Piyush Goyal) हे लोकसभेवर निवडून आल्यावर त्यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला देण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. भाजपच्या वतीने तसे कोणी असे काही आश्वासन दिल्याबद्दल काहीच स्पष्ट केलेले नाही. (BJP)
या पार्श्वभूमीवर भाजप गोयल यांची राज्यसभेची जागा अजित पवार गटासाठी सोडणार का, असा प्रश्न आहे. गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेची मुदत ही जुलै २०२८ पर्यंत आहे. तर उदयनराजे भोसले यांच्या रिक्त झालेल्या जागेची मुदत ही एप्रिल २०२६ पर्यंत आहे. यामुळेच गोयल यांची रिक्त झालेली जागा मिळावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community