राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपसोबत सत्तेत बसल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा बालेकिल्ला समजला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ टार्गेट केला आहे. 4 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांनी बारामती दौरा काढला. त्यावेळी त्यांनी आव्हानाची भाषा केली, तसेच शरद पवारांवरही टीका केली.
बारामतीमधून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मात्र २०२४ च्या निवडणुकीत आता अजित पवार (Ajit Pawar) बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देतील, अशी दाट शक्यता आहे. तसे झाल्यास बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय असा पवार कुटुंबात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. बारामतीसाठी मीच उभा आहे असे समजून मी देणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. आज वातावरण मोदींना संधी द्यावी या पद्धतीनेच आहे. शेती, घरकुल अशा खूप योजना त्यांनी आणल्या आहेत. भारताचे नाव जगामध्ये उंचावले आहे. मी सरकारमध्ये असल्याने बारामतीमध्ये कामे होत आहेत. आपल्या विचाराचा खासदार झाल्यास आपली कामे झाली पाहिजेत हे मला सांगता येईल, असेही पवार म्हणाले.
…तर बारामती विधानसभा निवडणुकीत थेट भूमिका घेईन
आपला खासदार झाल्यावर आपले बारामती रेल्वे स्टेशन आधुनिक करेन, असे सांगत तुम्हाला भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. तिकडे अजितला द्या, आता इकडे या, असे म्हटले जाईल. अजितचे म्हणणे असे आहे की, तिकडे आणि इकडेही अजितला द्या. जर मीठाचा खडा टाकला, तर मी आमदारकीच्या बाबतीत पण विचार करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे काय करायचे ते तुम्ही ठरवा, असे आव्हान अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.
विचारधारा सोडली नाही
मी राजकीय भूमिका घेतली आहे. मी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीमध्ये माझे अशा पद्धतीने स्वागत करतील, असे वाटले नव्हते. अनेक मिरवणूक बघितल्या, वरिष्ठांच्या बघितल्या पण असे स्वागत कधी झाले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर नको नको ते शब्द वापरण्यात आले. मात्र, आपण भूमिका घेतल्यानंतर एक शब्द कोणी बोलले नाही, असाही दावा अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना केला. आम्ही एनडीएच्या आघाडीत आहोत. आपण सगळ्यांचे नेतृत्व बघून सुरुवातीच्या काळात आम्ही मोदींवर टीका केली. मात्र, विचारधारा सोडली नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community